‘इस्लामची शिकवण आणि वेदान्ताचा आत्मा’ यावर आधारित ऐक्य करावे, हा स्वामी विवेकानंदांचा संदेश होता!
अमलेंदू मिश्र लिखित ‘Identity and Religion : Foundations of anti-islamism in India’ हे पुस्तक नुकतेच हाती पडले आहे. हा लेख या पुस्तकातील ‘विवेकानंदांचा हिंदू पुनरुत्थानाचा संकल्प’ या प्रकरणाची एक झलक आहे. विवेकानंद खचितच वैश्विकता अन् बंधुतेचा संदेश देऊ पाहत होते. परंतु, त्यामागील पार्श्वभूमी, त्यांचे नेमके हेतू, त्यांचा काळ या सर्वांची तार्किक मांडणी करणारे हे प्रकरण मुळातून वाचावे असे आहे.......